
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ३९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सोमवारी होत आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्सवर हा सामना रंगणार आहे. गुजरात सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे, तर कोलकाताची कामगिरी संमिश्र झाली आहे.
त्यामुळे आता गुजरात फॉर्म राखणार की कोलकाता बाजी मारणार हे या सामन्यानंतर स्पष्ट होईल. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.