
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (५ एप्रिल) संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सविरुद्ध ५० धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर मोठी नाट्यमय घटना घडली.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २०६ धावांचे लक्ष्य पंजाब किंग्ससमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्सने २० षटकात ९ बाद १५५ धावांवर रोखले.