
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १८ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने ५० धावांनी विजय मिळवला. पूर्ण फिट झालेल्या संजू सॅमसनच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळताना राजस्थानने पंजाब किंग्सला शनिवारी (५ एप्रिल) त्यांच्यात घरच्या मैदानात मुल्लनपूर येथे पराभवाचा धक्का दिला. हा राजस्थानचा सलग दुसरा विजय ठरला. मात्र पंजाब किंग्सचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्ससमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. राजस्थानकडून गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली, त्यातही जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी चांगली गोलंदाजी केली.