
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा आज (२७ मे) अखेरचा साखळी सामना. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे.
यंदा प्लेऑफमधील यापूर्वीच निश्चित झाले असले तरी पहिल्या दोन क्रमांकासाठीची चुरस शेवटच्या सामन्यापर्यंत रंगली आहे. आता या सामन्यानंतर अखेर पाँइंट्स टेबलमधील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा सामना बंगळुरू संघासाठी मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे.
गेली १८ वर्षांपासून विजेतेपदाची वाट पाहणाऱ्या बंगळुरूला यंदा ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. त्यांनी जर हा सामना जिंकला, तर ते या स्वप्नाच्या आणखी जवळ पोहचतील. कारण जर हा सामना जिंकला, तर बंगळुरू दुसरा क्रमांक मिळवून क्वालिफायर १ सामन्यात प्रवेश मिळवू शकतात.