
IPL 2025 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये अडखळणारे दोन संघ, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आज समोर आले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होतोय आणि प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे आणि ती लय कायम राखण्याचे आता दोघांसमोर आव्हान आहे.