
इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेला ७४ सामन्यांनंतर अखेर विजेता मिळाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून आयपीएल सुरू असलेला थरार अखेर ३ जून रोजी संपला. १८ वर्षांपासून प्रतिक्षा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपदाला गवसणी घातली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मंगळवारी (३ जून) बंगळुरूने पंजाब किंग्सला अवघ्या ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचे आठवे आणि नवे विजेते ठरले.