
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा आता शेवट जवळ आला असून गुरुवारी (२९ मे) अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला संघ मिळणार आहे. गुरुवारी या स्पर्धेतील क्वालिफायर १ सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे.
हा सामना नवी चंदीगढमधील मुल्लनपूरयेथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामना खेळेल.
तसेच पराभूत होणाऱ्या संघाला दुसरी संधी मिळणार आहे. पराभूत होणारा संघ क्वालिफायर २ सामना खेळेल. पण थेट अंतिम सामन्यात पोहण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.