
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील पहिला टप्पा आता येत्या आठवड्यात संपेल. मात्र असे असतानाच काही संघांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला गेल्या आठवडाभरात मोठे धक्के बसले आहेत.
पंजाब किंग्स संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाला आहे. शनिवारी (१२ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळत असताना फर्ग्युसनच्या दुखापतीने डोके वर काढले. तो या सामन्यात फक्त दोन चेंडू टाकून लंगडत मैदानातून बाहेर गेला होता.