
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला साधारण आठवडाभराच्या स्थगितीनंतर शनिवारी (१७ मे) सुरूवात झाली. पण स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. शनिवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता.
पण शनिवारी सामन्यादरम्यान बंगळुरूमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाची संततधार सुरू असल्याने अखेल सामना रात्री १०.३० च्या दरम्यान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.