
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा २४ वा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीने ६ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
दिल्लीचा अक्षर पटेलच्या नेतृत्वातील हा सलग चौथा विजय आहे. दिल्ली यंदाच्या हंगामात अद्याप अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. बंगळुरूला मात्र पाच सामन्यांमध्ये दुसऱ्या पराभवाचा सामोरे जावे लागले आहे. त्यांचे यंदाच्या हंगामातील दोन्ही पराभव घरच्या मैदानातच झाले आहेत.