
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या सुरू असून गुरुवारी मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्वपद पुन्हा एकदा एमएस धोनी सांभाळताना दिसणार आहे. सध्याचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर अधिकृत माहिती याबद्दल दिली आहे. चेन्नईने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाडच्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.