
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील २४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात गुरुवारी (१० एप्रिल) खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १५० धावा करतानाही संघर्ष करावा लागला आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंगळुरू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.