IPL 2025: नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात तरी पालटणार का RCB चे नशीब अन् यंदा खरं ठरणार ee sala cup namde?

Royal Challengers Bengaluru Team Analysis: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या १८ व्या हंगामात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उरणार आहे. त्यांची ताकद अन् कमजोरी काय आहे, त्यांचा संघ कसा आहे आणि संपूर्ण वेळापत्रक, याचा घेतलेला आढावा.
RCB | IPL 2025
RCB | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. पहिलाच सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. यंदा हे दोन्ही संघ नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहेत. बंगळुरू संघ हा नेहमीच चर्चेत राहणाराही संघ आहे.

पहिल्या हंगामापासून आत्तापर्यंत सर्व हंगाम बंगळुरूने खेळले आहेत. परंतु, त्यांना विजेतेपद मिळवता आलेलं नाही. तीनदा त्यांना अंतिम सामन्यात जाऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

आता पुन्हा एकदा बंगळुरू नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात नशीब आजमवणार आहेत. बंगळुरूने रजत पाटिदारकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. याशिवाय संघात मोठे बदलही झाले आहेत. गेल्यावर्षी संघात असलेले बरेच खेळाडू यंदा संघात नाही.

बंगळुरू संघाने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तिघांनाच रिटेन केलं होतं. तसेच स्वप्नील सिंगला त्यांनी आरटीएम वापरून संघात परत घेतले आहे. या चौघांव्यतिरिक्त बाकी संघ नवा आहे. त्यामुळे पाटिदारसमोर नव्या संघासह पुढे जाण्याचं आव्हान असणार आहे.

RCB | IPL 2025
IPL 2025: जुने भिडू एकत्र आलेत... CSK सर्वांची भंबेरी उडवणार; MS Dhoni ची शेवटची आयपीएल? सारे मिळून गाजवणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com