RR vs CSK Live Match Marathi Update: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये अखेर विजयाचे खाते उघडले. दोन पराभवांचा सामना करणाऱ्या RR ने रविवारी चेन्नई सुपर किंग्सला गुवाहाटीत पराभूत केले. चेन्नईला शेवटच्या षटकांत २० धावांची गरज असताना जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) गोलंदाजीला येणं अपेक्षित होते, परंतु संदीप शर्माला ते षटक दिले गेले. महेंद्रसिंग धोनीने पहिलाच चेंडू उत्तुंग मारला, परंतु शिमरोन हेटमायरने अफलातून झेल घेत CSK च्या चाहत्यांची बोलती बंद केली.