
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जाणार आहे. सोमवारी (२८ एप्रिल) होत असलेला हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानात सवाई मनसिंह स्टेडियम, जयपूर येथे खेळवला जात आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.