RR vs MI Live: शाणा, रोहित शर्मा! शेवटच्या सेकंदाला DRS घेतला अन् चमत्कार झाला; पत्नी रितिकाचं टेंशन गेलं, पण चर्चा 'Fixing' ची

IPL 2025 RR vs MI Marathi Cricket Update: रोहित शर्माने पुन्हा एकदा आपली हुशारी दाखवली. दुसऱ्या षटकात तो माघारी परतला असता परंतु त्याच्या हुशारीने त्याला वाचवले. पंचाने बोट वर केलं आणि प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला. मात्र, शेवटच्या सेकंदाला रोहितने DRS घेतला अन्...
ROHIT SHARMA
ROHIT SHARMA esakal
Updated on

Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: रोहित शर्माला स्मार्ट क्रिकेटपटू का म्हणतात, हे आज पुन्हा सिद्ध झाले. फझलहक फारूकीने दुसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सच्या रोहितला LBW केले आणि अम्पायरनेही बाद दिले. रिव्ह्यू साठीच्या १५ सेकंदाचा कालावधी संपत असताना रोहित दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टनसोबत चर्चा करत राहिला. अगदी शेवटच्या क्षणाला त्याने DRS घेतला. सर्वांचे लक्ष मोठ्या स्क्रीनकडे गेले अन् चमत्कारच झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com