
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला ८ दिवसांच्या स्थगितीनंतर पुन्हा सुरुवात झाली असून रविवारी (१८ मे) ५९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आमने-सामने होते. \
सवाई मानसिंह स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात नेहल वढेरा आणि शशांक सिंगने पंजाबसाठी वादळी खेळी केली. त्यामुळे पंजाबने राजस्थानसमोर २२० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.