
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (१८ मे) दोन सामने खेळवण्यात येणार असून दुपारचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जात आहे. हा ५९ वा सामना असून जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जात आहे.
स्थगितीनंतर आयपीएल पुन्हा सुरू झाले असून राजस्थान आणि पंजाब हे स्थगितीनंतर पुन्हा पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत. राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. पण पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. राजस्थानचे आव्हान संपले असले तरी त्यांना तळातील स्थान टाळण्यासाठी विजय आवश्यक आहे.