
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने १० धावांनी विजय मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये १७ गुणांसह दुसरा क्रमांक मिळला आहे. यासह त्यांनी जवळपास प्लेऑफचं तिकीटही जवळपास पक्के केले आहे. \
राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाले आहेत. पण त्यांना तळातील स्थान टाळण्यासाठी उर्वरित सामने महत्त्वाचे होते. परंतु, त्यांना १० व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकात ७ बाद २०९ धावाच करता आल्या. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी आक्रमक खेळताना विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण पंजाबच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी पुनरागमन केले.