
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ११ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (३० मार्च) खेळला जात आहे. गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सासाठी चिंता वाढवणारी घटना घडली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने १८३ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ससमोर ठेवले आहे.