
चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (२३ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासह चेन्नईने घरच्या मैदानातून यंदाच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली आहे.
दरम्यान, मुंबईला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला असला, तरी त्यांच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट घडली. मुंबई संघातील एका नव्या स्टारने या सामन्यावेळी सर्वांचे लक्ष वेधले. हा खेळाडू म्हणजे २४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू विग्नेश पुथूर. मुळचा केरळच्या असलेल्या विग्नेशला मुंबईने आयपीएल लिलावात ३० लाखांच्या किंमतीत खरेदी केले आहे.