IPL 2026: ऋतुराज गायकवाड, सॅमसनवरील दबाव वाढला; चेन्नईसमोर पराभवाची मालिका टाळण्याचे लक्ष्य, दिल्लीशी आज लढत, कशी असेल प्लेइंग-११

CSK VS DC: चेन्नई सुपर किंग्स सलग पराभवानंतर पुनरागमनासाठी सज्ज असून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची लढत निर्णायक ठरणार आहे. ऋतुराज गायकवाड व संजू सॅमसन यांच्यावर मोठी जबाबदारी, तर गोलंदाजांकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा.
CSK VS DC

CSK VS DC

sakal

Updated on

चेन्नई : सलग तीन लढतींत पराभवांना सामोरे गेल्यानंतर पाच वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पाय खोलात गेला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई संघाला अद्याप सूर गवसलेला नाही. संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड या सलामी फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव निश्चितच वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई संघासमोर आज (ता. ११) दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान असणार आहे. दिल्लीचा संघ तिसऱ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com