CSK VS KKR: सूर सापडलेल्या चेन्नई संघाचे पारडे जड; कोलकाता पहिल्या विजयाच्या शोधात, आज चेन्नई vs कोलकाता, कशी असेल प्लेइंग-११
Chennai vs Kolkata: चेन्नई आणि कोलकता यांच्यातील महत्त्वाच्या आयपीएल सामन्यापूर्वी चेन्नई संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. संजू सॅमसनच्या शानदार शतकामुळे संघाला बळ मिळाले असून कोलकता अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
चेन्नई :आयपीएल गुणतक्त्यामध्ये सध्या शेवटच्या दोन क्रमांकावर असलेल्या चेन्नई आणि कोलकता यांच्यात आज सामना होत आहे. अखेरचा सामना थाटात जिंकलेला असल्यामुळे चेन्नई संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.