

Kolkata Knight Riders
esakal
IPL 2026: आयपीएल (IPL) 2026 चा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. कोलकातासाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. या हंगामाची सुरुवात कोलकाता नाइट रायडर्सची (Kolkata Knight Riders) खराब झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता नाइट रायडर्सने 4 सामने खेळले असून त्यांनी 3 सामने गमावले आहेत आणि 1 सामना रद्द झाला होता, त्यामुळे गुणतालिकेत (points table) आता शेवटच्या स्थानावर आहेत. कोलकाता नाइट रायडर्सचा पुढील सामना हा 14 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) सोबत होणार आहे. त्याआगोदर कोलकातासाठी चांगली बाब म्हणजे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज त्यांच्या ताफ्यात सामील होणार आहे.