MS Dhoni: मी फिट दिसतोय ना? वय वाढलं की... MS Dhoni चा चेन्नईतील CSK च्या अखेरच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

MS Dhoni’s Fitness Video Goes Viral: एमएस धोनीचा फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरणार का याची चर्चा रंगली आहे. MS Dhoni, CSK, IPL 2026 चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवत आहेत.
MS Dhoni’s Fitness Video Goes Viral

MS Dhoni’s Fitness Video Goes Viral

esakal

Updated on

MS Dhoni’s Fitness Video Goes Viral: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत धोनी मैदानात उतरलेला नाही. सुरुवातीला चेन्नई संघाकडून सांगण्यात आलं होतं की धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे दोन आठवडे खेळणार नाही, परंतु आता १२ सामने उलटून देखील धोनी मैदानात उतरलेला नाही. चेन्नई संघाचे चाहते अजूनही त्यांच्या लाडक्या थालाची वाट पाहत आहेत. आज चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. तत्पूर्वी धोनीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com