

IPL 2026 Playoff Race
esakal
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणारे तीन संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता एका स्थानासाठी चुरस दिसून येत आहे. साखळी फेरीचा अखेरचा टप्पा रविवारी (ता. २४) संपणार आहे. याच दिवशी प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरणार आहे.