IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nuwan Thushara: आरसीबीने 2025 च्या मेगा लिलावात तुषाराला 1.6 कोटी रुपयांत संघात घेतले होते. मात्र, फिटनेस निकष पूर्ण न केल्याचे कारण देत बोर्डाने त्याला NOC देण्यास नकार दिला. तुषाराच्या मते, त्याने आधीच केंद्रीय करार नूतनीकरण न करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कळवला होता.
Nuwan Thushara

Nuwan Thushara

esakal 

Updated on

IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम सध्या सुरू आहे. 28 मार्चपासून या हंगामाची सुरुवात झाली होती, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना झाला आहे. ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबादला 4 विकेट्स ने हरवल आहे. ज्यात संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने 38 चेंडूत 69 धावांची वादळी खेळी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अनेक नवीन नवीन खेळाडू आहेत, तसच 2025 च्या मेघा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने श्रीलंकाचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला आपल्या संघात सामील केलं होत. सध्या त्याने कोलंबो जिल्हा न्यायालयात एक याचीका दाखल केली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषार सध्या ना हरकत प्रमाणपत्र (NOC) वादामुळे न्यायालयात पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com