Hardik Pandya : हार्दिकचा टीकाकारांना उत्तर न देताच 'करारा जवाब'

Hardik Pandya Best Answer To Critics
Hardik Pandya Best Answer To Criticsesakal

अहमदाबाद : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) आपल्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याच्या कॅप्टन्सीबाबत सर्वजण साशंक होते. मात्र हंगाम संपता संपता सर्वांना कॅप्टन (Captain) हार्दिकची ओळख झाली. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या फॉर्म आणि दुखापतीमुळे त्याच्याभोवची हंगामापूर्वीच साशंकतेचे ढग जमा झाले होते. मात्र त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करून दाखवली.

Hardik Pandya Best Answer To Critics
IPL Final सुरू होण्यापूर्वीच झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

गुजरात टायटन्सने पहिल्या हंगामात खेळताना 14 पैकी 10 सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर पहिल्या क्वलिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सने फायनल गाठली. इथवरच्या प्रवासात गुजरातचे अनेक सामने अटीतटीचे झाले. मात्र कर्णधार हार्दिक पांड्या कायम शांत आणि संतुलित होता. तो एम एस धोनीला आपला मार्गदर्शक मानतो. त्या प्रमाणेच त्याने कूल कॅप्टन्सी करण्याचा प्रयत्न आपल्या पहिल्याच हंगामात केला.

Hardik Pandya Best Answer To Critics
IPL Closing Ceremony : रणवीरचा गुजराती तडका; रेहमानच्या वंदे मातरमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

या संपूर्ण प्रवासाबद्दल खुद्द हार्दिक पांड्या काय विचार करतोय? गुजरात टायटन्सने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक आपल्या टीकाकारांबद्दल (Critics) आणि लीगच्या आपल्या रणनितीबद्दल बोलताना दिसत आहे.

हार्दिक म्हणाला की, 'माझ्या आयुष्यात अनेक लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. काही लोकांनी माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असेच काहीसे लिलावावेळी देखील झाले. रिटेंशन असो किंवा नेतृत्व असो अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र या सर्वांना उत्तर देण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांना उत्तरच न देणे. ज्या लोकांनी माझ्याबद्दल मते व्यक्त केली. मला त्यांना पलटून काही बोलण्याची गरज नाही. मला वाटते की त्यांना याचे उत्तर मिळाले आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com