
आयपीएलच्या प्रसारण हक्कासाठी स्काय स्पोर्ट्स, सुपर स्पोर्ट्सही इच्छुक
मुंबई : आयपीएलच्या पुढील पाच वर्षाच्या प्रसारण हक्कासाठी (IPL media rights) बीसीसीआयला जवळपास 50 हजार कोटी रूपये महसूल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयने यासाठी आमंत्रण निविदा (Invitation to Tender) काढल्या होत्या. आता आंतरराष्ट्रीय प्रसारण हक्कासाठी युकेमधील स्काय स्पोर्ट्स (Sky Sports) आणि दक्षिण आफ्रिकेतील सुपर स्पोर्ट्स (Supersport) या चॅनेलनी आमंत्रण निविदा घेतल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. एका बीसीसीआय अधिकाऱ्या पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'हो स्काय स्पोर्ट्स आणि सुपर स्पोर्ट्स यांनी आमंत्रण निविदा घेतल्या आहेत. अनेक कंपन्या ह्या निविदा अभ्यास करण्यासाठी घेत आहेत. 25 लाख रूपये या कंपन्यांसाठी फार मोठी रक्कम नाही. आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ही खूप जास्त असल्याने या कंपन्या बिडिंग प्रक्रियेत उतरण्याची दाट शक्यता आहे.' आमंत्रण निविदा विकत घेण्याची शेवटची तारीख ही 10 मे आहे. त्यानंतर इ ऑक्शन आयपीएल झाल्यानंतर होईल.
हेही वाचा: मुंबईने नवा विकेटकिपर शोधला; टायमल मिल्स आयपीएल मधून बाहेर
यापूर्वी व्हायकॉम 18, झी एन्टरटेन्मेंट, सोनी, ड्रीम 11, स्टार यांनी भारतातील प्रसारण हक्कासाठी याआधीच आयपीएलच्या आमंत्रण निविदा घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रसारण हक्कासाठी चांगलीच चुरस होण्याची शक्यता आहे. मात्र आयपीएलच्या आमंत्रण निविदा घेतल्या म्हणजे त्या कंपनीने टेंडर दाखल करावेच असे काही नाही. बीसीसीआयने प्रसारण हक्कासाठी चार वेगवेगळे पॅकेज तयार केले आहे. यात गेल्या वर्षीसराखे संमिश्र टेंडर दाखल करण्यास मनाई केली आहे. यंदाच्या प्रसारण हक्काच्या चार पॅकेजमध्ये भारतीय उपखंडासाठी टीव्ही हक्क, डिजिटल राईट्स, 18 सामने (उद्घाटन सामना, वीकएन्ड डबल हेडर, 4 प्ले ऑफचे सामने) आणि उर्वरित जग या विभागांचा समावेश आहे.
हेही वाचा: ऑलिम्पिक फायनलिस्ट थाळीफेकपटू कमलप्रीत कौर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
आयपीएलच्या प्रसारण हक्काची बेस प्राईस जवळपास 32 हजार कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. यंदा प्रसारण हक्काची वेगवेगळ्या भागात विभागणी केल्याने त्याची मुल्य जवळपास 700 कोटी अमेरिकन डॉलर इतके पोहचेल. असे असले तरी सततच्या सामन्यांमुळे प्रेक्षक आता आयपीएलकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे त्याचा टीआरपी खाली येत आहे. गेल्या वर्षी स्टारने 16347 कोटी रूपयाला प्रसारण हक्क खरेदी केले होते. यंदा प्रत्येक विभागात सर्वोच्च बोली लावणाऱ्याला हक्कम मिळणार आहेत.
Web Title: Ipl Media Rights Sky Sports Supersport Picking Up Invitation To Tender
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..