VIDEO : कधी कधी जिद्द अन् प्रयत्नाचही कौतुक होतं

MI vs PBKS
MI vs PBKSSakal News

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) सलामीवीरांनी तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. शिखर धवन (Shikhar Dhavan) आणि मयंका अग्रवालने (Mayank Agarwal ) पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत संघाचा भक्कम पाया रचला. पहिल्या नऊ षटकात या सलामी जोडीनं 10 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. दोघांच्या तुफान फटकेबाजीसमोर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. पण या परिस्थितीत डेवॉल्ड ब्रेविसनं (Dewald Brevis) लढण्याची जिद्द काय असते, त्याचा नमुना फिल्डिंगवेळी दाखवून दिला.

पंजाब किंग्जच्या डावातील 10 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शिखर धवन स्ट्राइकवर होता. मुर्गन अश्विनच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा फटका खेळला. या चेंडूवर त्याला सहा धावाही मिळाल्या. पण त्याचे कॅचमध्ये रुपांतर करण्यासाठी ब्रेविसचा धाडसी प्रयत्न लाजवाब असाच होता. त्याने हवेत उडी मारून चेंडूला स्पर्श केला. पण झेल काय झाला नाही. त्याने क्षेत्ररक्षणावेळी दाखवलेलं हे धाडस चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेच होते. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला पहिले यश मिळाले. मयांक अग्रवाल 32 चेंडूत 52 धावांची खेळी करुन तंबूत परतला. सुर्यकुमार यादवने त्याचा झेल टिपला. या विकेट्स आधी ब्रेविसचा प्रयत्न हा त्याच्यात दडलेला कमालीच्या फिल्डरची ओळख करुन देणारा असाच होता.

MI vs PBKS
VIDEO : ... अन् VIP गॅलरीत निता अंबानींचा आनंद गगनात मावेना!
MI vs PBKS
KL राहुलची खवय्येगिरी; उथप्पाच्या बायकोची कमेंट चर्चेत

डेवाल्ड ब्रेविसला बेबी एबी अशी ओळख

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा कुटून प्रकाशझोतात आलेला दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला बेबी एबी म्हणून संबोधले जाते. एबी डिव्हिलियर्सप्रमाणे काही शॉट्स त्याच्याही भात्यातून पाहायला मिळतात. आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 3 कोटी मोजून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com