IPL 2022: मुंबई इंडियन्स खाते उघडणार?; वानखेडेवर लखनौविरुद्ध सामना | IPL Today Match 37 LSG VS MI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IPL Today Match 37 LSG VS MI

IPL 2022: मुंबई इंडियन्स खाते उघडणार?; वानखेडेवर लखनौविरुद्ध सामना

हेही वाचा: IPL मध्येच मिळाला भारताचा पुढचा कर्णधार, 'हा' अष्टपैलू लवकरच घेणार हिटमॅनची जागा

IPL 2022 : सलग सात पराभवांनंतर आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सचा आज फॉर्मात असलेल्या लखनौ संघाविरुद्ध सामना होत आहे. आम्ही पुढचा विचार करत नसून प्रत्येक सामन्याचा विचार करून खेळणार आहोत, असे मत मुंबई संघाचे संचालक झहीर खान यांनी व्यक्त केले. सलग सात सामने गमावले असले तरी पुढचे सलग सात सामने जिंकण्याची आमची क्षमता आहे, असा विश्वास उद्या होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर झहीर खान यांनी व्यक्त केला.(IPL Today Match 37 LSG VS MI)

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला होता, परंतु निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पाच वेळा अजिंक्यपद जिंकणाऱ्या आमच्या संघासाठी यंदाचा मोसम अनपेक्षित असल्याचे झहीर खान म्हणाले. प्रत्येक दिवस तुमचा नसतो, पण तुम्ही मैदानावर उतरून सर्वोत्तम प्रयत्न करता. जे गोलंदाज जास्त धावा देत आहेत तेच नंतर तुमच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करतील, असेही झहीर खान यांनी सांगितले.

हेही वाचा: IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video

लखनौविरुद्ध दुसरा सामना

लखनौविरुद्ध हा मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौचा कर्णधार केएल राहुलने केलेले शतक निर्णायक ठरले होते. त्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करतानाही रोहित आणि ईशान यांनी निराशा केली होती, मात्र डेवाल्ड ब्रेविस आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगला लढा दिला होता.

संघात बदल होणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघात उद्याच्या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता आहे. राखीव खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. पण त्याअगोदर प्रमुख खेळाडूंना योगदान द्यावे लागणार आहे आणि याची सुरुवात रोहित शर्मापासून सुरू होत आहे. सात सामन्यांत त्यालाही सूर सापडलेला नाही. गेल्या सामन्यात तर तो शून्यावर बाद झाला होता. तसेच सर्वाधिक किंमत मिळालेल्या ईशान किशनचेही अपयश सलणार आहे. उद्याच्या सामन्यात या दोघांना भक्कम सुरुवात करून द्यावीच लागणार आहे.

Web Title: Ipl Today Match 37 Lsg Vs Mi Lucknow Super Giants And Mumbai Indians

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top