हार्दिक पांड्या एन्जॉय विथ फॅमिली! फोटो व्हायरल

पहिल्या टप्प्यातील उणीव दुसऱ्या टप्प्यात भरुन काढण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.
Hardik Pandya With Son
Hardik Pandya With Son

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेची तयारी करत आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक पांड्याने पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड़्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अबूधाबीच्या समुद्र किनाऱ्यावरील काही खास क्षण शेअर केले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पांड्याने तीन फोटो शेअर केले आहेत. सायंकाळच्या वेळेत काढलेल्या फोटला पांड्याने 'माय बेबीज' असे खास कॅप्शन दिल्याचेही दिसते. पहिल्या फोटोमध्ये हार्दिक पांड्या आपल्या मुलासोबत खेळताना दिसते. दुसऱ्या फोटोत तो पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यासोबत सेल्फी क्लिक करताना पाहायला मिळते.

Hardik Pandya With Son
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी BCCI ची कठोर नियमावली

युएईमध्ये दाखल झाल्यानंतर नेट्समध्ये त्याने कसून सराव केला आहे. पांड्याने धवनच्या नेतृत्वाखालील श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. भारतामध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिक पांड्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हात. ही उणीव दुसऱ्या टप्प्यात भरुन काढण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देण्यात हार्दिक पांड्याची कामगिरीही नक्कीच मोलाची असेल.

Hardik Pandya With Son
IPL 2021 : विराट कोहली RCB ची कॅप्टन्सीही सोडेल?

पहिल्या टप्प्यातील 7 सामन्यात 52 धावा

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली. पण कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करावी लागली. गुणतालिके मुंबई इंडियन्स 7 पैकी 4 विजयासह चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्या सर्वच्या सर्व सात सामन्यात खेळला. पण त्याला केवळ 52 धावा करता आल्या. तो गोलंदाजी करतानाही दिसले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com