IPL 2025, Video: बटलरने कसला भारी कॅच घेतलाय! हवेत एका हाताने बॉल पकडला अन् DC च्या फलंदाजाला गोल्डन डकवर माघारी धाडलं

Jos Buttler Brilliant Catch: शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात जॉस बटलरने हवेत सूर मारत एका हाताने अफलातून झेल घेतला. पाहा व्हिडिओ.
Jos Buttler | DC vs GT
Jos Buttler | DC vs GTSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी दुपारचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या हंगामात अनेक झेल खेळाडूंकडून सुटलेले दिसले आहे, पण त्याचबरोबर काही खेळाडूंनी अफलातून झेलही घेतले आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यातही गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरनेही अफलातून झेल या सामन्यात घेतला.

Jos Buttler | DC vs GT
IPL 2025: इशांत शर्माला सामन्यातच भोवळ आली? अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णाही वेदनेने त्रासले; सामन्यात नेमकं काय घडतंय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com