KL Rahul | 'दुबळ्या संघाविरूद्ध शतक करून काय फायदा?'

KL Rahul 2nd Century against Mumbai Indians
KL Rahul 2nd Century against Mumbai IndiansESAKAL
Updated on

मुंबई : आयपीएलच्या 37 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर 168 धावा उभारल्या. विशेष म्हणजे या 168 धावात कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) एकट्याच्या 103 धावांचा मोठा वाटा आहे. केएल राहुलने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे शतक (2nd Century) ठोकले. विशेष म्हणजे ही दोन्ही शतके त्याने मुंबई इंडियन्स विरूद्ध ठोकली आहेत. केएल राहुलच्या या कॅप्टन्स इनिंगची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या या शतकी खेळीवर मीम्सचा पाऊस पडत आहे.

KL Rahul 2nd Century against Mumbai Indians
एका IPL बोलीने क्लार्कबरोबरची मैत्री तुटली; सायमंट्सने केला खुलासा

अशाच एका नेटकऱ्याने राहुलच्या शतकी खेळीवरून मुंबई इंडियन्सला चिमटा काढला. त्याने दुबळ्या संघाविरूद्ध शतक करून काय फायदा असे म्हणत मुंबईच्या हंगामातील खराब कामगिरीवर निशाणा साधला.

KL Rahul 2nd Century against Mumbai Indians
इरफान पठाणने अमित मिश्राच्या 'संविधान' ट्विटवर दिली प्रतिक्रिया

तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने केएल राहुल हा एकटा योद्धा आहे जो लखनौ सुपर जायंटमधील मनिष पांडे, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या या बिनकामाच्या मधल्या फळीचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेत आहे. असे म्हणत लखनौ सुपर जायंटच्या मधल्या फळीवर टीका केली.

टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शंभर करणारे फलंदाज

  • रोहित शर्मा 6

  • केएल राहुल 6

  • विराट कोहली 5

  • सुरेश रैना 4

आयपीएलमध्ये सर्वाधिक शंभर करणारे फलंदाज

  • ख्रिस गेल 6 (141 डाव)

  • विराट कोहली 5 (207 डाव)

  • जॉस बटलर 4 (71 डाव)

  • केएल राहुल 4 (93 डाव)

  • शेन वॉट्सन 4 (141 डाव)

  • डेव्हिड वॉर्नर 4(155 डाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com