LSG vs CSK: IPL 2024 मध्ये सर्वात फास्ट बॉल टाकणारा मयंक चेन्नईविरुद्ध खेळणार का? कोचनेच केला खुलासा

Mayank Yadav: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 21 वर्षीय वेगवान मयंक यादव लखनौ सुपर जायंट्सकडून पुनरागमन करणार की नाही, याबाबत प्रशिक्षकांनीच महत्त्वाची अपडेट दिली आहे.
Mayank Yadav | IPL 2024
Mayank Yadav | IPL 2024Sakal

LSG vs CSK, IPL 2024 Match: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शुक्रवारी (१९ एप्रिल) होणार आहे. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

या सामन्यातून लखनौ संघात २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादव पुनरागमन करणार की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, याबाबत लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुझनर यांनी अपडेट दिली आहे.

मयंक या स्पर्धेच्या सुरुवातीलाच प्रकाशझोतात आला होता. त्याने आत्तापर्यंत तीन आयपीएल सामने खेळले, ज्यात त्याने सातत्याने जवळपास ताशी १५० किमी वेगाने चेंडू टाकले.

Mayank Yadav | IPL 2024
PBKS vs MI: आशुतोषने थोडं टेन्शन दिलं होतं.. निसटत्या विजयानंतर हार्दिकने केलं पंजाबच्या पठ्ठ्याचं कौतुक

यादरम्यान, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध बेंगळुरूमध्ये खेळताना ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकला होता. हा आयपीएलच्या १७ व्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला.

मात्र, मयंक गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर पाठीच्या बाजूच्या स्नायुंमध्ये आलेल्या ताणामुळे लखनौच्या गेल्या दोन सामन्यात खेळलेला नाही. पण त्याला संघात खेळवण्यासाठी लखनौ आता उत्सुक असेल मात्र अद्यापही त्याच्या उपलब्धतेबाबत शंका असल्याचे क्लुझनर यांनी सांगितले.

क्लुजनर चेन्नईविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले, 'उद्या चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या उपलब्धतेबाबत मला अद्याप खात्री नाही. तो नेट्समध्ये सराव करत आहे, पण आम्हाला त्याच्या तंदुरुस्तीला प्राधान्य द्यायचे आहे. पण त्याच्या सामन्यातील सहभागाबाबत काहीही सांगू शकत नाही.'

Mayank Yadav | IPL 2024
Ashutosh Sharma: स्वप्न पाहिलं अन् पूर्णही झालं... बुमराहला मारलेल्या 'त्या' षटकाराबाबत काय म्हणाला आशुतोष?

त्यामुळे आता मयंकची उपलब्धता अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मयंकने आत्तापर्यंत 3 आयपीएल सामने खेळले असून 6 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, मयंकने सध्या नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली असून त्याचा एक व्हिडिओही लखनौने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता मयंक कधी पुनरागमन करतो, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, चेन्नई आणि लखनौ यांच्यात आत्तापर्यंत 3 सामने खेळवण्यात आले असून १ सामना चेन्नईने, 1 सामना लखनौने जिंकला आहे, तर 1 सामना रद्द झाला होता.

तसेच आयपीएल 2024 मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास लखनौने 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने पराभूत झाले आहेत, तसेच चेन्नईने 6 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने पराभूत झाले आहेत. (Mayank Yadav Availability for LSG vs CSK IPL Match Update)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com