
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. मंगळवारी (२७ मे) या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकाना स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
या सामन्यानंतर प्लेऑफला सुरुवात होणार असून हा लखनौचा अखेरचा सामना देखील आहे, तर बंगळुरूला या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये खेळायचे आहे. हा सामना लखनौचा कर्णधार रिषभ पंतने मात्र गाजवला आहे. त्याने या सामन्यात दमदार शतक ठोकले.