Mother’s Day : लखनौच्या खेळाडूंनी घातली आईच्या नावाची जर्सी | Lucknow Super Giant Mothers Day Special | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucknow Super Giant Mothers Day Special

Mother’s Day : लखनौच्या खेळाडूंनी घातली आईच्या नावाची जर्सी

पुणे : आयपीएलच्या 53 वा सामना आज लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giant) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knights Riders) यांच्यात होत आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. हा सामना लखनौ सुपर जायंटने खूप खास केला. रविवारी 8 मेला मदर्स डे (Mother’s Day) साजरा केला जातो. मात्र लखनौने त्याच्या पूर्वसंध्येलाच मदर्स डे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला. आजच्या कोलकात्याविरूद्धच्या सामन्यात लखनौचे खेळाडू आपल्या आईचे नाव असलेली जर्सी (Mothers Name Jersey) घालून मैदानात उतरले.

हेही वाचा: PBKS vs RR : हेटमायरच्या हिटिंगने पंजाबचा राजस्थावर 'रॉयल' विजय

लखनौ सुपर जायंटचे खेळाडू कोलोकताच्याविरूद्धच्या सामन्यात आईच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरणार याची घोषणा संघाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर आज सामना सुरू होण्यापूर्वी काही तास करण्यात आली होती. या व्हिडिओला लखनौने 'हे सगळं तुझ्यासाठी आई. आम्ही अशा प्रकारे मदर्स डेची तयारी करत आहोत #SuperGiant पद्धतीने.' असे कॅप्शनही दिले आहे.

हेही वाचा: संजूच्या 'या' रेकॉर्डवरून नेटकऱ्यांनी केली चेष्टा, पण...

भारतीय संघानेही असेच केले होते

भारत ज्यावेळी 2016 ला घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरूद्ध मालिका खेळत होता. त्यावेळी कर्णधार असणाऱ्या महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसह संघातील खेळाडूंनी आपल्या आईच्या नावाची जर्सी घातली होती. यामागे प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या आईचे मोठे योगदान असते. त्यामुळे फक्त वडिलांचे नाव का लावायचे. त्यामुळे भारतीय संघ आईच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरला होता.

लखनौने केकेआर विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात केएल राहुलच्या रूपात आपली पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर क्विटंन डिकॉक आणि दीपक हुड्डाने भागीदारी रचत डाव सावरला होता. डिकॉक 50 धावांवर बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी लखनौला शतकी मजल मारून दिली. मात्र आंद्रे रसेलने 41 धावांवर खेळणाऱ्या दीपक हुड्डाला आणि 25 धावा करून त्याला साथ देणाऱ्या क्रुणाल पांड्याला बाद करत मोठा धक्का दिला.

Web Title: Lucknow Super Giant Mothers Day Special Lsg Players Ware Mothers Name Jersey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top