PBKS vs RR : हेटमायरच्या हिटिंगने राजस्थानचा पंजाबवर 'रॉयल' विजय

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal Shine Rajasthan Royals Defeat Punjab Kings
Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal Shine Rajasthan Royals Defeat Punjab Kings ESAKAL

IPL 2022: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पंजाब किंग्जचे (Punjab Kings) 190 धावांचे आव्हान 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. राजस्थान आता 14 गुण घेऊन प्ले ऑफच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याला देवदत्त पडिक्कलने 31 तर शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) 15 चेंडूत 31 धावा करत चांगली साथ दिली. राजस्थानकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या.

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal Shine Rajasthan Royals Defeat Punjab Kings
LSG vs KKR Live : केकेआरसमोर लखनौच्या नवाबांचे आव्हान

पंजाब किंग्जने ठेवलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. बटलर आक्रमक फलंदाजी करत होता. 47 धावांच्या सलामीत त्याच्या एकट्याच्या 30 धावा होत्या. कसिगो रबाडाने 30 धावांवर बाद केले.

त्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू सॅमसनला ऋषी धवनने 23 धावांवर बाद केले. बटलर आणि संजू सॅमसन हे आक्रमक फलंदाज लवकर माघारी गेल्यानंतर सलामीवीर यशस्वी जैसवालने चांगली झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे राजस्थानने शतकी मजल मारली.

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal Shine Rajasthan Royals Defeat Punjab Kings
संजूच्या 'या' रेकॉर्डवरून नेटकऱ्यांनी केली चेष्टा, पण...

यशस्वी जैसवालने 41 चेंडूत 68 धावा चोपून सामन्याचे पारडे राजस्थानकडे झुकवले. मात्र 15 व्या षटकात अर्शदीपने त्याला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. यशस्वी बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायरने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी सामना बॉल टू रन असा आणला. अखेर अर्शदीपने 32 चेंडूत 31 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले. त्यामुळे सामना 6 चेंडूत 8 धावा असा आणला. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार मयांकने राहुल चहरला पाचारण केले. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकत सामना 6 चेंडूत 7 धावा असा आणला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायरने षटकार मारत सामना राजस्थानच्या पारड्यात टाकला. त्यानंतर विजयी धाव चौथ्या चेंडूवर घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 15 चेंडूत आक्रमक 31 धावा केल्या.

Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal Shine Rajasthan Royals Defeat Punjab Kings
"खेळण्यापेक्षा त्याचं लक्ष..."; सेहवागने केली डेव्हिड वॉर्नरची चहाडी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी 47 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर राजस्थानने पंजाबला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली.

पहिला धक्का अश्विनने धवनच्या (12) रूपात दिला. त्यानंतर आलेल्या राजपक्षे आणि बेअरस्टोने भागीदारी रचण्याच प्रयत्न केला. मात्र युझवेंद्र चहलने आपला जवला दाखवत 27 धावा करणाऱ्या भानुका राजपक्षेचा अडसर दूर केला. दरम्यान, जॉनी बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

त्यानंतर युझवेंद्र चहलने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार मयांक अग्रवालला 15 धावांवर बाद करून अजून एक धक्का दिला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवर 56 धावा करणाऱ्या बेअरस्टोची शिकार करत पंजाबची अवस्था 4 बाद 119 धावा अशी केली. पंजाबच्या पाठोपाठ विकेट पडत असताना जितेश शर्मा आणि लिम लिव्हिंगस्टोनने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 170 धावांच्या जवळ पोहचवले.

मात्र 19 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने लिव्हिंगस्टोनला 22 धावांवर बाद केले. त्यानंतर जितेश शर्माने फटकेबाजी करत 18 चेंडूत 38 धावा केल्या. या जोरावर पंजाबने 20 षटकात 189 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने 28 धावात 3 विकेट घेतल्या. तर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com