LSG vs KKR : लखनौ केकेआरला हरवून पोहचली टॉपवर |Lucknow Super Giants Defeat Kolkata Knights Riders | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucknow Super Giants Defeat Kolkata Knights Riders

LSG vs KKR : लखनौ केकेआरला हरवून पोहचली टॉपवर

पुणे : लखनौ सुपर जायंटचे 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंटच्या गोलंदाजांनी 101 धावांवर डाव गुंडळला. लखनौने केकेआरवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. केकेआरकडून आंद्रे रसेलने 45 धावा करत एकाकी झुंज दिली. तर लखनौकडून आवेश खान आणि जेसन होल्डरने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. (Lucknow Super Giants Defeat Kolkata Knights Riders Reach Top In Point Table)

हेही वाचा: केकेआरसाठी शिवम मावी म्हणजे अवघड जागेचं दुखणं

लखनौने केकेआर विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात केएल राहुलच्या रूपात आपली पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर क्विटंन डिकॉक आणि दीपक हुड्डाने भागीदारी रचत डाव सावरला होता. डिकॉक 50 धावांवर बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी लखनौला शतकी मजल मारून दिली. मात्र आंद्रे रसेलने 41 धावांवर खेळणाऱ्या दीपक हुड्डाला आणि 25 धावा करून त्याला साथ देणाऱ्या क्रुणाल पांड्याला बाद करत मोठा धक्का दिला.

हेही वाचा: Mother’s Day : लखनौच्या खेळाडूंनी घातली आईच्या नावाची जर्सी

मात्र लखनौचा स्टार हिटर मार्कस स्टॉयनिसने शिवम मावी टाकत असलेल्या 19 व्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत धडाक्यात सुरूवात केली. मात्र मावीने स्टॉयनिसला (28) चौथ्या चेंडूवर बाद केले. परंतू त्यानंतर आलेल्या जेसन होल्डरने मावीला पुन्हा शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावात एकाच षटकात 30 धावा वसूल केल्या.

केकेआरला 19 वे षटक महागडे पडल्यानंतर 20 षटक टाकण्यासाठी आलेल्या साऊदने टिच्चून मारा केला. त्याने 4 धावा देत एक विकेट घेतली. यामुळे केकेआरला लखनौला 176 धावांवर थोपवणे सोपे गेले.

Web Title: Lucknow Super Giants Defeat Kolkata Knights Riders Reach Top In Point Table

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top