Rohit Sharma : शतक ठोकल्यानंतरही रोहित शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम! IPL मध्ये ठरला तिसरा खेळाडू

MI vs CSK IPL 204 Rohit Sharma : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 29व्या सामन्यात तब्बल 12 वर्षांनंतर हिटमॅन रोहित शर्माने या स्पर्धेतील दुसरे शतक ठोकले.
MI vs CSK IPL 204 Rohit Sharma News Marathi
MI vs CSK IPL 204 Rohit Sharma News Marathisakal

MI vs CSK IPL 204 Rohit Sharma : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 29व्या सामन्यात तब्बल 12 वर्षांनंतर हिटमॅन रोहित शर्माने या स्पर्धेतील दुसरे शतक ठोकले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघासमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने शानदार नाबाद शतक झळकावले पण त्याच्या संघाला 20 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

यामुळे रोहित आता आयपीएलच्या इतिहासातील अशा वाईट विक्रमाचा एक भाग बनला आहे जो आधी फक्त 2 खेळाडूंच्या नावावर होता. रोहितने 105 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले होते.

MI vs CSK IPL 204 Rohit Sharma News Marathi
IPL 2024 Points Table : चेन्नईविरुद्ध पराभवानंतर पांड्याला बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये गेली खाली...

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील या सामन्यापूर्वी केवळ 2 खेळाडू होते ज्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना शतकी खेळी खेळली, परंतु आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

आता या प्रकरणात रोहित शर्मा तिसरा खेळाडू ठरला आहे. रोहितपूर्वी 2010 मध्ये युसूफ पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

यानंतर 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली, पण त्याचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकला नाही.

MI vs CSK IPL 204 Rohit Sharma News Marathi
MI vs CSK IPL 2024 : 'स्टंपच्या मागे त्या व्यक्तीने...' मुंबईच्या पराभवानंतर धोनीबद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या?

रोहित शर्माचे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे, याआधी 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने 109 धावांचे नाबाद शतक झळकावले होते, त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 27 धावांनी सामना जिंकला होता. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी रोहित शेवटच्या 18 डावात नाबाद परतला आणि त्याच्या संघाने विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com