MS Dhoni
MS Dhoniesakal

MS Dhoni DC vs CSK : धोनी दिल्लीविरूद्धच्या सामन्यात येणार अन्... सीएसकेच्या बॅटिंग कोच मायकल हसीने दिले मोठे संकेत

MS Dhoni DC vs CSK IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीने हंगामाच्या सुरूवातीलाच ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टन्सी सोपवली. त्यानंतर तो हंगामातील पहिल्या दोन सामन्यात विकेटकिपिंग करताना दिसला.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो दुखापतीतून चांगला सावरल्याचे त्याच्या किपिंगवरून दिसून येत आहे. मात्र धोनीने अजून या हंगामात फलंदाजी केलेली नाही. धोनी फलंदाजी करण्यासाठी कधी मैदानावर येणार याबाबत सीएसकेचा बॅटिंग कोच मायकल हसीने मोठी भविष्यवाणी केली आहे.

MS Dhoni
IPL 2024 GT vs SRH Live Score : गुजरात टायटन्सने हैदराबादला 162 धावात रोखलं; गोलंदाजांची सांघिक कामगिरी

हसीने दिल्लीविरूद्धच्या आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आपल्या स्टाईलमध्ये षटकार मारून सामना संपवणार अशी भविष्यवाणी केली आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत म्हणतो. 'माझा अंदाज आहे की सामन्याच्या शेवटच्या षटकात आज महेंद्रसिंह धोनी क्रिजवर असणार. चाहते धोनी... धोनी... नावाचा जयघोष करत असतील आणि तो षटकार मारून सामना संपवणार.'

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला होता. ते आज दिल्ली कॅपिटल्ससोबत विशाखापट्टणम येथे खेळणार आहेत.

MS Dhoni
Mayank Yadav: 'खूप लोक म्हणतात सूर्या अन् बुमराहसारखा...' IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान बॉल टाकणारा मयंक काय म्हणाला पाहा

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने नवा कर्णधार ऋतुराजच्या नेतृत्वाखाली सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी पहिल्या उद्घाटनाच्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. ऋतुराजच्या कॅप्टन्सीची सुरूवात योग्यरित्या झाली असून विकेटमागून धोनीचे त्याला मार्गदर्शन मिळत आहे.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने आपले दोन्ही सामने गमावले असून विजयाचे खाते उघडण्यासाठी ते आतूर आहेत. मात्र त्यांचा सामना हा पाचवेळा आयपीएल टायटल जिंकलेल्या सीएसकेसोबत होणार आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com