दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी धोनी खातोय बॅट; फोटो व्हायरल | MS Dhoni News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Eating Bat

दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी धोनी खातोय बॅट; फोटो व्हायरल

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फलंदाजीला येण्यापूर्वी धोनी पुन्हा एकदा त्याची बॅट खाताना कॅमेऱ्यात कैद झाला, विश्वास बसत नाही, धोनीला त्याची बॅट चावण्याची खूप विचित्र सवय आहे. डगआऊट किंवा ड्रेसिंग रूममध्ये तो अनेकदा त्याची बॅट चावताना दिसला आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धोनी अनेकदा फलंदाजी करण्यापूर्वी त्याची बॅट का खाताना दिसतो. यामागचे कारण टीम इंडियामध्ये धोनीसोबत खेळणारा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने ट्विटरवर सांगितले आहे.(MS Dhoni Eating Bat)

हेही वाचा: DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्ण शय्येवर; हृदयस्पर्शी फोटो केला शेअर

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बॅट खाताना दिसला. या सामन्यात त्याने 8 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळली. चेन्नईने दिल्लीवर 91 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. यामध्ये अमित मिश्राने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. तो त्याच्या बॅटमधून टेप काढण्यासाठी असे करतो, कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. त्याच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघताना दिसणार नाही.

हेही वाचा: CSK vs DC : चेन्नईने जाता जाता दिल्लीचे 'प्ले ऑफ' गणित बिघडवले

महेंद्रसिंग धोनी वयाच्या 41 जवळपास आहे, परंतु त्याने हे दाखवून दिले की सध्याच्या आयपीएल 2022 मध्ये त्याच्यासाठी वय हा फक्त एक नंबर आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले, पण संघाच्या खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजाने पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद सोपवले.

Web Title: Ms Dhoni Eating His Bat Before Going To Bat Against Dc Vs Csk Amit Mishra Reveals Reason

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLMS DhoniIPL 2022
go to top