टॅक्स भरण्यातही 'कॅप्टन कूल' अव्वल! झारखंड-बिहार सर्कलमध्ये धोनीचा पुन्हा डंका; आयकर विभागाची विक्रमी वसुली

MS DHONI BECOMES TOP TAXPAYER: महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटसोबतच कर भरण्याच्या बाबतीतही अव्वल स्थान मिळवलं आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार तो बिहार आणि झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारा वैयक्तिक करदाता ठरला आहे.
MS DHONI BECOMES TOP TAXPAYER

MS DHONI BECOMES TOP TAXPAYER

esakal

Updated on

MS DHONI BECOMES TOP TAXPAYER: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी(MS. DHONI) कर भरण्याच्या बाबतीतही नंबर वन ठरला आहे. तो या बाबतीत अव्वल ठरला आहे. ही माहिती आयकर विभागाने दिली आहे. आयकर विभागाच्या(Income Tax Department) ताज्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षात झारखंड आणि बिहारमधून एकूण २०,००० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राज्यांतील वैयक्तिक करदात्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक कर भरला आहे. तर कंपन्यांमध्ये सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (CCL), भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) आणि CMPDI यांनी सर्वाधिक कर भरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com