

Mukul Chaudhary
esakal
कोलकता : केवळ तिसरा आयपीएल सामना आणि त्यातही विद्युत प्रकाशझोतात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ, असे असतानाही अद्भुत टोलेबाजी करून लखनौ संघातील मुकुल चौधरीने इतिहास घडवला. षटकारांची बरसात केली आणि संघाच्या पराभवाचे विजयात बघता बघता रूपांतर केले. या अविस्मरणीय खेळीने आयपीएलचा नवा हीरो सापडल्याची चर्चा सुरू झाली.