
CSK vs MI : चेन्नईला 97 धावांवर गुंडाळणाऱ्या मुंबईची देखील झाली 'दमछाक'
मुंबई : मुंबई इंडियन्सने कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने इंग्लंडला 97 धावातच गुंडाळले. त्यानंतर चेन्नईने देखील मुंबईला विजयासाठी चांगलेच झुंजवले. त्यांनी मुंबईची अवस्था 4 बाद 33 धावा अशी केली होती. अखेर तिलक वर्मा आणि ऋतिक शोकीनने भागीदारी रचून मुंबईला विजयाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत 14.5 षटकात 103 धावा करत टार्गेट पूर्ण केले. मुंबईकडून गोलंदाजीत डॅनियल सॅम्सने 3 तर चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 विकेट घेतल्या. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 36 धावा केल्याने सीएसके 97 धावांपर्यंत पोहचू शकली. (Mumbai Indians Defeat Chennai Super Kings In Low Scoring Match)
हेही वाचा: मुंबईकडून अपमानित होण्याची चेन्नईला जडली सवय; पाहा आकडेवारी काय सांगतेय
चेन्नईने 98 धावांचे माफक आव्हान पार करताना मुंबईची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्याच षटकात इशान किशन 6 धावा करून बाद झाला. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. त्यानंतर सिमरजित सिंगने रोहित शर्माला 18 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. यानंतर मुंकेश चौधरीने पाचव्या षटकात डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्सला शुन्यावर बाद करत मुंबईची अवस्था 4 बाद 33 अशी केली.
मात्र मुंबईची 4 बाद 33 अशी बिकट अवस्था झाली असताना तिलक वर्माने ऋतिक शौकीनबरोबर पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. शौकीनने संयमी फलंदाजी केली. मात्र विजयासाठी 17 धावांची गरज असताना तो मोईन अलीच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला. त्यानंतर आलेल्या टीम डेव्हिडने 7 चेंडूत 16 धावा चोपून सामना 15 व्या षटकात संपवला. तिलक वर्माने 32 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या.
हेही वाचा: वानखेडेची बत्ती गुल, चेन्नई DRS ला मुकली; अंबानींचे मीम्स व्हायरल
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण डाव 97 धावात गुंडाळला. मुंबईचा वेगावान गोलंदाज डॅनियल सॅम्सने चेन्नईची टॉप ऑर्डर उडवली. त्याने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट घेतल्या. दरम्यान, 3 बाद 5 धावांवरून चेन्नईच्या मधल्या फलंदाजीने डाव सावण्याचा प्रयत्न केला.
मात्र रायुडू 10, शिवम दुबे 10 आणि ब्राव्हो 12 धावा करून परतले. संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटपर्यंत फलंदाजी करत 33 चेंडूत 36 धावा केल्या. त्यामुळे चेन्नई निदान शंभरच्या जवळ जाऊ शकली. मुंबईकडून कुमार कार्तिकेय आणि रिले मॅरेडिथ यांनी प्रत्येकी 2 तर रमनदीप सिंह आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Web Title: Mumbai Indians Defeat Chennai Super Kings In Low Scoring Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..