

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला आता काहीच दिवस राहिलेले असताना संघांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. ५ वेळचे विजेत्या मुंबई इंडियन्सचे खेळाडूही मुंबईत दाखल झालेले असून त्यांच्या सरावाला सुरुवात झाली आहे.
पण खेळाडू सरावासोबतच थोडी मस्ती करतानाही दिसत आहेत. त्यांचे व्हिडिओही सध्या मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरून शेअर करण्यात येत आहेत. अशाच दोन व्हिडिओची सध्या चर्चेत आहे.