IPL 2024 : CSK कॅम्पमधून मोठी बातमी! स्टार खेळाडू अचानक गेला भारत सोडून घरी... नेमकं घडलंय तरी काय?

IPL 2024 Mustafizur Rahman News : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे.
IPL 2024 Mustafizur Rahman News Marathi
IPL 2024 Mustafizur Rahman News Marathi sakal

IPL 2024 Mustafizur Rahman News : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे.

या दोन्ही सामन्यांमध्ये ज्या खेळाडूचे महत्त्वाचे योगदान होते, आता तो खेळाडू बाहेर गेला आहे. आयपीएल 2024 दरम्यान संघ सोडून तो अचानक घरी गेला आहे. यामुळे सीएसकेचे टेन्शन वाढले आहे. चेन्नईचा पुढील सामना 5 एप्रिल रोजी पॅट कमिन्स संघ सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

IPL 2024 Mustafizur Rahman News Marathi
IPL 2024 Point Table : लखनऊविरुद्ध पराभवानंतर RCB ला मोठा धक्का! टेबलमध्ये पांड्याची मुंबई आहे तरी कुठे?

चेन्नई सुपर किंग्जचा घातक गोलंदाज मुस्तफिजुर रहमान हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशातील त्याच्या घरी परतला आहे. चेन्नई आणि हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पुढील सामन्यात मुस्तफिझूर संघाचा भाग नसल्याचा दावा या अहवालात केला जात आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर तो अमेरिकेतील काही व्हिसाच्या कामासाठी बांगलादेशला परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तो पुढचा सामना खेळू शकणार नाही हे निश्चित मानले जात आहे, पण तरी तो एकापेक्षा जास्त सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे अशा बातम्या येत आहेत.

IPL 2024 Mustafizur Rahman News Marathi
RCB vs LSG: तीन कॅच अन् रॉकेट थ्रो! फक्त तुफानी फलंदाजीच नाही, तर पूरनने फिल्डिंगमध्येही खाल्ला भाव; पाहा Video

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही रहमानने 4 षटकात केवळ 29 धावा देत 4 बळी घेतले. यामुळे आरसीबी संघाचे कंबरडे मोडले आणि चेन्नईने सामना जिंकला.

यानंतर सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यातही मुस्तफिझूरने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. मग दिल्लीविरुद्धही मुस्तफिझूरने एक विकेट घेतली. अशा प्रकारे, 7 विकेट्ससह मुस्तफिझूर पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com