
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गेल्या १८ वर्षांपासून पहिल्या विजेतेपदाची वाट पाहणारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ मंगळवारी (३ जून) अंतिम सामन्यात खेळणार आहे.
त्यामुळे या दोन्ही संघांपैकी एकाची प्रतिक्षा संपणार आणि आयपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे यंदा चाहतेही कोणता संघ ही प्रतिक्षा संपवणार हे पाहण्यासाठी उत्सुर आहेत.