

Mumbai Indians: इंडियन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व 70 सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे अंतिम 4 संघही निश्चित झाले आहेत, तर सहा संघांचे आव्हान संपले आहे. या सहा संघांमध्ये पाचवेळचे आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचाही समावेश आहे.
मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला. मुंबईला आयपीएलच्या १७ व्या हंगामात 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकता आले. त्यांनी 10 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला. त्यामुळे त्यांना केवळ 8 पाँइंट्सच मिळवता आले. त्यामुळेच मुंबई पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना खेळल्यानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सची संघमालकीण नीता अंबानी यांनी खेळाडूंशी संवाद साधलेला दिसत आहे. त्यांनी म्हटले की यंदाचा हंगाम निराशाजनक होता.
नीता अंबानी म्हणाल्या, 'आपल्या सर्वांसाठीच निराशाजनक हंगाम होता. आपल्याला जशा गोष्टी हव्या होत्या, तशा त्या झाल्या नाहीत. पण मी फक्त एक मालकीण नाही, तर मुंबई इंडियन्सची नेहमीच एक मोठी चाहती राहिली आहे.'
'मला वाटते मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करणे एक सन्मान आहे. मुंबई इंडियन्सशी जोडले जाणे माझ्यासाठी एक सन्मान आणि आणि आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते की आता आपण परत जाऊ आणि कामगिरीची समीक्षा करूस, यावर विचार करू.'
याशिवाय नीता अंबानी यांनी आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या आपल्या संघातल खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय संघात निवडलेल्या रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही शुभेच्छा दिल्या.
त्यांनी यावेळी त्यांना खास मेसेज देताना म्हटले, 'रोहित, हार्दिक, सूर्या आणि बुमराह टी२० वर्ल्ड कपसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला आशा आहे की तुम्ही टी२० वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी कराल.'
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्यावर आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.