
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३१ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. मुल्लनपूर येथे झालेल्या कमी धावसंख्येच्या या सामन्यात पंजाब किंग्सने थरारक विजय मिळवला. पंजाबने १६ धावांनी हा सामना जिंकला.
पंजाबच्या विजयात अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलने महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. यानंतर पंजाब किंग्सची संघमालकीण प्रीती झिंटा भलतीच खूश झालेली दिसली.